तू संगीत तोंडाने आवाज करून का काढलेस?
मला रेडिओ ऐकायला फार आवडत असे. मी एक लहानसा सेट एका दुकानातून विकत आणला. रात्री झोपताना बिछान्यात रेडिओे ऐकत निद्राधीन होत असे. कधी कधी माझे आई-वडील रात्री उशिरापर्यंत बाहेर जात, तेव्हा ते खोलीत गुपचूप येऊन माझ्या कानातला इअरफोन काढत असत आणि रात्री झोपेपर्यंत माझ्या कानातून काय काय आत जाते आहे, रात्रभर झोपेत असताना डोक्यात काय काय घोळते आहे, याबद्दल काळजी करत असत.......